कंपोस्ट खत
काही गोष्टी सर्वांनी मिळून तर काही वैयक्तिक पातळीवर करता येण्यासारख्या आहेत. त्यातलीच ही एक.
पर्यावरण सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. आपण सगळेच त्याविषयी बोलत असतो. पर्यावरणाशी निगडित अनेक बाबींपैकी एक म्हणजे कचरा. पर्यावरण संवर्धनासाठी आपला एक खारीचा वाटा म्हणून गेले वर्षभर मी घरच्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रयोग केला. ठाणे येथील एका संस्थेचे मार्गदर्शन मिळाले आणि समजले घरच्या घरी खत बनवणे
खूप सोप्पं आहे. पैसे फार लागत नाहीत. जागा जास्त लागत नाही. कुठलाही घाणेरडा वास येत नाही. ऱोज फक्त पाच मिनिटे द्यावी लागतात. जे खत होइल ते वापरता येते.
घरटी ऱोज किमान पाव किलो कचरा मानला तरी वर्षभरात जवळपास १०० किलो कचरा आपण निसर्गात फेकण्यापासुन वाचवू शकतो. १०० किलो हा आकडा माझ्यामते नक्कीच कमी नाही.
आपल्यापैकी काहीजणांनी हा प्रयोग आधी केलाही असेल. असल्यास याचा प्रचार करा ही विनंती आणि नसल्यास हा प्रयोग चालू करा हा आग्रह. पर्यावरणासाठी सुरुवात आपल्या घरापासूनच करुया.
या प्रयोगाविषयी अधिक माहिती येथे देत आहे.

पर्यावरण शाळा या ठाणे येथील संस्थेकडून मी एक छोटी बकेट विकत घेतली. त्यात विटांचा चुरा, उसाचे चिपाड, शेण, सुकी पाने, बायोकल्चर यांचा थर असतो. बकेटला पाणी जाण्यासाठी खाली भोके असतात आणि वर झाकणालाही भोके असतात ज्यावर जाळी लावलेली असते कीटक येउ नयेत म्हणून. ही बकेट मी पाचशे रुपयांना त्या संस्थेकडुन विकत घेतली. आपण घरी बनवली तर २००-३०० रुपये लागतील. पण त्यापेक्षा थोडे पैसे देउन रेडिमेड घेणे जास्त सोयीस्कर आहे. तेव्हढीच त्या संस्थेला मदत. ठाण्याला जाणे शक्य नसल्यास अशा कुठल्याही संस्थेकडून घेता येइल.
मग रोज ओला कचरा या बकेटमध्ये टाकायचा. म्हणजे भाजी, कोथींबीर, कांदे बटाटे वगैरे चिरल्यावर राहिलेला कचरा, फळांची साले. हा कचरा जमेल तेव्हढा बारीक करावा म्हणजे विघटन नीट होते आणि खत बारीक होते.
खरकटे उरलेले अन्न टाकू नये. ऱोज कचरा भिजेल इतपत पाणी शिंपडावे. उन्हात बकेट ठेवू नये. चार-पाच दिवसानी एकदा कचरा वरखाली करावा. (हातात प्लास्टिक पिशवी घेउन करु शकता). मी थोडे बायोकल्चर घेतले होते संस्थेकडून, ते अधेमधे टाकले ज्यामुळे लवकर विघटन व्हायला मदत होते.
बकेट भरली की साधारण दोन महिने बंद करून ठेवावी. मग फक्त अधेमधे पाणी टाकणे आणि कचरा वर खाली करणे एव्हढेच करावे. मग खत तयार होते. हे खत झाडांना वापरता येते.
आपल्याला याबाबत अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास मला फोन केलात तरी चालेल.
सुबोध विद्वांस
९३२२१८१५७१
कंपोस्ट खताच्या महतीवर एक शॉर्ट फिल्म बनवली होती त्याची लिंक येथे देत आहे.
https://youtu.be/mB_jfIovdv0
घरी असलेल्या कंपोस्ट बिनचे फोटो
कंपोस्ट खताच्या महतीवर एक शॉर्ट फिल्म बनवली होती त्याची लिंक येथे देत आहे.
https://youtu.be/mB_jfIovdv0
घरी असलेल्या कंपोस्ट बिनचे फोटो

No comments:
Post a Comment