Followers

Tuesday, 1 March 2022

CSR to PSR - ब्लॉगची संकल्पना

नमस्कार,

कॉर्पोरेट क्षेत्रात CSR हा परवलीचा शब्द झाला आहे. CSR म्हणजेच Corporate Social Resonsibility. अर्थात व्यावसायिक पातळीवरील सामाजिक दायित्व. यात कंपन्यांना आपल्या नफ्याचा एक विशिष्ट हिस्सा हा सामाजिक कार्यकरता द्यावा लागतो. ज्या समाजातून हा नफा कमावला जातो त्या समाजाप्रती आपले काही दायित्व आहे ही भावना रुजावी ही यामागील कल्पना. टाटा सारख्या अनेक कंपन्या या सक्तीच्या सहभागापुढे जाऊन विविध मार्गाने समाजाकरिता आपले योगदान देत आहेत.

CSR च्या कल्पनेतून एक मनात विचार आला की वैयक्तिक पातळीवरही PSR चालू केले पाहिजे. म्हणजे Personal Social Responsibility. यात आपल्या कमाईचा एक वाटा हा सामाजिक कार्यासाठी प्रत्येकाने द्यायचा. मग तो वाटा छोटा का मोठा हे महत्त्वाचे नाही. कोणाकडे पैसे नसल्यास वेळही देउ शकतो. महत्त्वाचे म्हणजे सरकार व्यतिरिक्त वैयक्तीक पातळीवर आपलेही दायित्व आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात आली तर अनेक प्रश्न सुटतील. यासाठी कायदा करून काही होणार नाही कारण लोक पळवाटा शोधतील. मुळात हा मूल्यशिक्षणाचा भाग आहे त्यामुळे PSR यशस्वी होण्यासाठी इतर योग्य मार्ग शोधले पाहिजेत.

ज्या सामाजिक संस्था तळमळीने कार्य करत आहेत त्यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध झाली तर समाजातील दानशूर व्यक्तींना / संस्थांना अशा संस्था निवडणे सोप्पे जाईल आणि त्याचप्रमाणे या सर्व संस्थांच्या कार्याचा प्रचार होइल या विचारातून हा ब्लॉग तयार केला आहे.



धन्यवाद
सुबोध विद्वांस
गोरेगाव, मुंबई
९३२२१ ८१५७१
subodhvidwans@rediffmail.com