Followers

Sunday, 27 February 2022

देणे समाजाचे - एक सद्भावना महोत्सव मुंबई आणि ठाणे २०२२




पुण्यातील दिलीप गोखले आणि वीणा गोखले यांच्या प्रयत्नातून सुरु झालेला आणि गेली सतरा वर्ष चालू असलेला  "देणे समाजाचे" हा  एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. 'आर्टिस्ट्री, पुणे' या संस्थेमार्फत हा महोत्सव आयोजित केला जातो.

'आर्टिस्ट्री, पुणे'  प्रस्तुत 'देणे समाजाचे' हे एक अनोखे व्यासपीठ आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला करून देणे , त्यांना आर्थिक तसेच इतर मदत मिळवून देणे आणि त्याच बरोबरीने समाजालाही त्यांचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून देणे , असा ह्या उपक्रमाच्या मागचा उद्देश आहे. २००५ ते २०२१  ह्या कालावधीत जवळपास २००  सामाजिक संस्था ह्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि किमान दहा कोटी निधीची भरीव मदत सेवाभावी संस्थांना मिळवून दिली. सहभागी संस्थांकडून कोणतीही शुल्क आकारणी न करता हा भव्य उपक्रम गेली १७  वर्षे पुण्यामध्ये व्रतस्थपणे राबवला जातो.

ह्या  वेळी वेगवेळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या, प्रामुख्याने  ग्रामीण, निमशहरी भागातल्या निवडक अशा सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले  जाते  . या सर्व संस्था निवडताना अतिशय काटेकोरपणे निवडल्या जातात जेणेकरून योग्य अशा संस्थाना मदत मिळेल.

काय होतं की अनेकांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते पण कुठली संस्था योग्य आहे हा प्रश्न पडतो.  ह्याचे उत्तर ह्या प्रदर्शनात मिळते .  स्त्रिया आणि लहान मुलांचे प्रश्न, अनाथ मुले, वृद्ध, ग्रामीण विकास, विशेष मुले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न, अंध,  अपंग,  दुष्काळग्रस्त भागाचे प्रश्न, धान्य बॅंक अश्या विविध विषयांवर काम करणाऱ्या संस्था असतात.  या संस्थांचे काम खरच कौतुकास्पद असते. प्रत्येक संस्थेचे प्रतिनिधी त्यांच्या स्टॉलवर माहिती देतात. समाजात उत्तम काम करणाऱ्या अनेक लोकांशी एकाच वेळी संवाद साधण्याची ही एक उत्तम संधी असते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. डोनेशन द्यायलाच हवे अशी सक्ती / सुचना नाही. आपण आर्थिक किंवा इतर स्वरूपातील मदत करू शकता ( सेवा, वस्तू, कपडे, विशेष कौशल्य वगैरे)

देणगीदार आणि सामाजिक संस्था, यामध्ये एक विश्वासार्ह दुवा ठरलेल्या 'देणे समाजाचे' हा उपक्रम यावर्षी १२, १३  फेब्रुवारी २०२२  रोजी मुंबई येथे  आणि २६ , २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ठाणे येथे पार पडला.  मुंबईतले हे तिसरे वर्ष आणि ठाण्यातले पहिले वर्ष.    

काही कारणामुळे या प्रदर्शनाला भेट देऊ न शकलेल्यांसाठी फक्त एक सोय म्हणून या वर्षी प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व संस्थांची माहितीपत्रके मी या ठिकाणी एकत्र केलेली आहेत. या पोस्टवर टाकलेली सर्व पत्रके ही या प्रदर्शनातून मिळवलेली आहेत.


नम्र विनंती - 

१) या प्रदर्शनाचा उद्देश हा लोकांनी प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट देऊन संस्थेच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा हा आहे. प्रत्यक्ष भेटीतून संस्थेची माहिती मिळतेच पण  त्याहून महत्वाचे म्हणजे एक अनोखा भावनिक बंध निर्माण होतो आणि याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही म्हणून कृपया ही माहितीपत्रके  कुठल्याही सोशल मिडीयावर प्रसिद्ध करू नयेत ही कळकळीची विनंती.  

२) आपण कुठल्याही स्वरुपाची मदत केल्यावर त्याची  माहिती वीणा गोखले (98220 64129) यांना कळवावी कारण ही माहिती गोळा केल्यावर त्याचे विश्लेषण केले जाते आणि त्यातून निघणारे निष्कर्ष या उपक्रमाचे मूल्यांकन करताना उपयोगी येतात.



धन्यवाद

सुबोध विद्वांस
गोरेगाव, मुंबई
९३२२१८१५७१
subodhvidwans@rediffmail.com


















रसिकाश्रय  - यवतमाळ



















आधार  - ठाणे 
























युवान  - अहमदनगर




















स्नेहवन - खेड 




















पालवी - पंढरपूर 
























बालग्राम - बीड 




















स्नेहवन - कर्जत 













सेवाधाम  - शिरूर 












आरंभ  - औरंगाबाद


















लोकसाधना  - रत्नागिरी















संवेदना - पुणे 






मैत्री - मेळघाट 








वी टुगेदर (धान्य बँक) - ठाणे 








सेवालय - लातूर 




















































एकवीरा - अकोला 















राजहंस प्रतिष्ठान - गोरेगाव मुंबई





सोबती  - वाडा 









आशा फाउंडेशन  - जळगाव 





















आनंदग्राम - बीड 













श्वेता असोसीएशन - पुणे 











सिर्फ - पुणे 














सिग्नल शाळा - ठाणे 










मैत्री - डोंबिवली 











विद्यादान  - ठाणे 






स्नेहदीप -  अहमदनगर 
























No comments:

Post a Comment